Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > 'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक

'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक

Top Multibagger Stocks : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजार अस्थिर असला तरी काही शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 16:08 IST2025-10-16T16:07:13+5:302025-10-16T16:08:34+5:30

Top Multibagger Stocks : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजार अस्थिर असला तरी काही शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

Top Multibagger Stocks RRP Semiconductor Turns ₹1 Lakh into ₹1 Crore with 10,000% Return Since Last Diwali | 'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक

'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक

Top Multibagger Stocks : गेल्या दिवाळीपासून (दिवाळी २०२४) भारतीय शेअर बाजारातील मुख्य निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी, एका विशिष्ट मर्यादेत फिरत असले तरी, काही निवडक शेअर्सनी मात्र गुंतवणूकदारांचे नशीब अक्षरशः पालटले आहे. या शेअर्सनी बाजाराच्या संथ गतीला मात देत 'रॉकेट' वेगाने परतावा दिला आहे. एका शेअरने तर तब्बल १०,०००% पेक्षा जास्त परतावा देऊन १ लाख रुपयांचे थेट १ कोटी रुपयांमध्ये रूपांतर केले आहे.

परताव्याचा बादशहा
गेल्या दिवाळीपासून सर्वाधिक परतावा देणाऱ्या शेअर्सच्या यादीत आरआरपी सेमीकंडक्टर लिमिटेड या कंपनीने सर्व विक्रमांना मागे टाकले आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना १०,०७५% चा अविश्वसनीय परतावा दिला आहे. या प्रचंड परताव्यामुळे, ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले होते, त्यांची संपत्ती आज १ कोटींहून अधिक झाली आहे.

या कंपनीच्या गतीमागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे तिच्या नावातील बदल. यापूर्वी कंपनीचे नाव G D Trading & Agencies Ltd. असे होते, मात्र नाव बदलून RRP Semiconductor Ltd. होताच शेअरच्या किमतीने तुफान गती पकडली आणि तो गुंतवणूकदारांसाठी 'मल्टीबॅगर' ठरला.

हजारो टक्के परतावा देणारे 'मल्टीबॅगर'

  • RRP Semiconductor व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्यांनीही आपल्या गुंतवणूकदारांना हजारो टक्क्यांमध्ये नफा मिळवून दिला आहे, ज्यामुळे त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे.
  • GHV Infra Projects: या शेअरने गुंतवणूकदारांना ५,४१५% इतका मोठा परतावा दिला, जो RRP नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • Elitecon International: या कंपनीच्या शेअर्समध्ये ३,४०२% ची जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे.
  • Midwest Gold: या स्टॉकनेही मागे न राहता २,६०६% इतका दमदार रिटर्न दिला.
  • Colab Platforms: तंत्रज्ञान क्षेत्रातील या शेअरने गुंतवणूकदारांना २,१८६% चा तगडा नफा मिळवून दिला.

या शेअर्सनीही संपत्तीत केली मोठी वाढ

  • स्ट्रिंग मेटाव्हर्स : या कंपनीने १,३६५% चा परतावा दिला.
  • CIAN ॲग्रो : या कृषी संबंधित शेअरमध्ये १,१६५% ची वाढ झाली.
  • कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन : या स्टॉकने १,०२८% परतावा दिला.

त्याचबरोबर, ब्लू पर्ल ॲग्रीव्हेंचर्स (७५४%) आणि बीजीआर एनर्जी (७३६%) या कंपन्यांनीही आपल्या गुंतवणूकदारांना ७०० टक्क्यांहून अधिक नफा मिळवून देऊन त्यांची झोळी भरली आहे.

या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, संपूर्ण बाजाराची गती मंदावली असली तरी, योग्य संशोधन आणि वेळेवर केलेली गुंतवणूक प्रचंड नफा देऊ शकते. बाजार नेहमी 'स्टॉक-स्पेसिफिक' असतो आणि योग्य वेळी योग्य शेअर निवडणे हेच यश मिळवण्याचे गमक आहे.

वाचा - पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?

टीप : हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने लिहिलेला आहे आणि कोणतीही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
 

Web Title : इस शेयर ने साल में 1 लाख को 1 करोड़ किया!

Web Summary : आरआरपी सेमीकंडक्टर ने 10,075% रिटर्न के साथ निवेशकों को मालामाल किया, 1 लाख को 1 करोड़ बनाया। जीएचवी इंफ्रा प्रोजेक्ट्स और एलीटकोन इंटरनेशनल ने भी शानदार रिटर्न दिया।

Web Title : Stock Turns ₹1 Lakh to ₹1 Crore in a Year!

Web Summary : RRP Semiconductor leads with 10,075% return, turning ₹1 lakh into ₹1 crore. GHV Infra Projects and Elitecon International also delivered impressive returns, making investors millionaires.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.